नगर, (प्रतिनिधी) – एमआयडीसी येथील सह्याद्री कंपनीच्या बंद पडलेल्या इमारतीत ४४ वर्षिय युवकाचा नायलाॅलनच्या पट्टीने गळा आवळून तसेच दगडाच्या साहाय्याने डोक्याचा चेंदामेंदा करून एकाचा खून केल्याची घटना शुक्रवार (दि.२३) रोजी उघडकीस आली. या बाबत अद्न्यात व्यक्तीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
बाळू उर्फ संदीप कमलाकर शेळे (वय ४४, रा. गजानन काॅलनी, नवनागापुर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या बाबत संतोष कमलाकर शेळके यांनी फिर्याद दिली आहे.
एम आयडीसी परीसरातील सह्याद्री चौकाजवळील एका बंद पडलेल्या कंपनीच्या परिसरात ही बुधवार (दि.२१ ते २३) रोजी घटना घडली असावी. या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
डोक्यात दगड घालून तसेच् दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरम्य़ान एमआयडीसी हद्दीत गुन्हेगारी चांगलीच वाढली आहे. गुन्हेगारांवर पोलीस प्रशासनाचा धाक राहिला नसल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.