पिंपरी – बनावट कागदपत्रांच्या आधारे बॅंकेत खाते उघडून त्याद्वारे गृहकर्ज घेऊन एका तरुणाची एक कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरक मच्छिंद्र मकासरे (वय 34, रा. हरगुडेवस्ती, मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. सारंगधर सहानी (वय 35, रा. बंगलौर, कर्नाटक) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि
आरोपी यांच्यात 2016 रोजी फ्लॅट विक्रीचा व्यवहार झाला होता. त्यानंतर आरोपी मकासरे याने फिर्यादीच्या नावाने जनसेवा बॅंकेत बनावट खाते उघडले. फ्लॅटच्या कागदपत्राच्या आधारे इंडियन ओव्हरसीज बॅंकेडून 56 लाख रुपये कर्ज घेत ते फिर्यादी यांच्या नावे उघडण्यात आलेल्या बनावट खात्यावर वर्ग करून घेतले. त्यानंतर फिर्यादी आणि आरोपी यांच्यातील फ्लॅटचा व्यवहार रद्द झाल्यानंतरही फायनान्सकडूनही 50 लाख रुपयांचे कर्ज घेवून एक कोटीची फसवणूक केली.