पुसेगाव – खटाव तालुक्यातील ललगुण गावासाठी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. सुनीता कचरे यांच्या विशेष प्रयत्नातून एक कोटी 29 लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती ललगुण विकास सेवा सोसायटीचे संचालक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते अमोल घाडगे यांनी दिली.
घाडगे म्हणाले, “”ललगुण गावच्या वाढत्या लोकसंख्येबरोबर अनेक ग्रामस्थांनी वस्त्यावर आपली घरे बांधली आहेत. गेली कित्येक वर्षे गोवर्धन वस्ती पिण्याच्या पाण्यापासून वंचित असल्यामुळे ग्रामस्थांची ससेहोलपट होत होती. याठिकाणी 100 लोकांची वस्ती असून पशुधनही मोठया प्रमाणात आहे. त्याठिकाणच्या ग्रामस्थांना पिण्याचा पाण्याचा सामना करावा लागत होता. याठिकाणी जलजीवन मिशन अंतर्गत गोवर्धन वस्ती येथे पाण्याची टाकी व पाइपलाइनसाठी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच येडाई मातानगरमध्ये तीच परिस्थिती गेली अनेक वर्ष होती.
या ठिकाणच्या लोकांची व्यथा लक्षात घेऊन खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे यांनी पिण्याच्या पाण्यासाठी 25 लाख रुपये मंजूर करून पाणीप्रश्न सोडविला आहे.” ललगुण येथील स्मशानभूमीत ते डोंगर तलाव हा रस्ता खडतर असून पावसाळ्यात शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या रस्त्याला डोंगरी विकास कार्यक्रमातून आमदार निधीतून 18- 19 मध्ये तीन लाख, 19- 20 मध्ये तीन लाख, 20- 21 मध्ये 24 लाख 58 हजार रूपये इतका निधी मंजूर केला आहे. ललगुण एसटी स्टॅण्ड ते इंग्लिश मिडीयम याठिकाणी माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा फंडातून 9 लाख रूपये मंजूर झाले आहेत. चैत्र महिन्यात जोतिबाची यात्रा मोठ्या प्रमाणात भरते.
याठिकाणी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या फंडातून 10 लाख रूपये सभामंडपासाठी मंजूर झाले आहेत. मरीआई माता मंदिर ते वलेश्वर मंदिर या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 21 लाख रुपये, गणेश मंदिर ते खालची आळी या रस्त्यासाठी सौ. सुनीता कचरे यांच्या फंडातून तीन लाख, बनकर सर यांच्या घराशेजारी क्रॉंक्रिटीकरण दोन लाख व जिल्हा परिषद शाळेच्या पत्र्यासाठी सहा लाख मंजूर झाले आहेत,अशी माहिती त्यांनी दिली.