शिक्रापूर -पाबळ (ता. शिरूर) येथे जमिनीच्या जुन्या वादातून एका युवकाला दोघांनी बेदम मारहाण केली. यामध्ये युवक गंभीर जखमी झाला आहे. याबाबत राजेंद्र ज्ञानोबा जाधव (रा. माळतळे वस्ती, पाबळ, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सागर रत्नपारखी व संतोष बाजीराव जाधव (दोघे रा. पाबळ) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
पाबळ येथील राजेंद्र जाधव हा रात्री घराजवळच्या ओढ्याजवळ गेला असताना त्या ठिकाणी सागर रत्नपारखी व संतोष जाधव हे दोघे फोनवर बोलत होते. त्यांनी राजेंद्रला जवळ बोलावून तुझ्या मित्रासोबत बोल, असे सांगून मोबाइल दिला. त्यांनतर दोघांनी जाधव यांच्या जमिनीच्या जुन्या वादातून राजेंद्रला जमिनीवर पाडून शिवीगाळ, दमदाटी करीत बेदम मारहाण केली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल कोळेकर करीत आहेत.