पुणे – बंद सदनिका फोडून हडपसर येथे दिड लाखाची घरफोडी करण्यात आली. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय आल्हाट(30,रा.हडपसर गाव) यानी दिलेल्या फिर्यादीनूसार 18 एप्रिल ते 22 मे दरम्यान ते घर बंद करुन बाहेरगावी गेले होते. परत आल्यावर त्यांना घराचे कुलूप उचकटलेले दिसले.
त्यांनी आत प्रवेश केला असता त्यांना बेडरुमच्या कपाटातील रोख 4 हजार सोन्याचे दागिने असा 1 लाख 44 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे आढळले. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अभिजित जोगदंड तपास करत आहेत.