पुणे – रमजान इदच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. विशेषतः वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तीन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची फौज वेगवेगळ्या भागात दक्षता बाळगणार आहे. त्याशिवाय एसआरपीएफ तुकड्या, डॉगस्कॉड, बॉम्ब शोधक नाशक पथकांकडूनही ठिकठिकाणी तपासणी करण्यात येणार आहे.
काही राजकीय पक्षांकडून मशीदींवरील भोंग्याबाबत वेगळी भूमिका घेण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही समाजातील शांतता कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी प्राधान्य दिले आहे. परिसरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासह ठिकठिकाणी कडेकोड बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच पोलिसांनी हद्दीत शांतता कमिटीची बैठक घेउन सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन केले आहे.
असा आहे बंदोबस्त –
-245 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी
-200 होमगार्ड
-एसआरपीएफ तुकडी
-बॉम्बशोधक आणि नाशक पथक
-540 कर्मचारी