मुंबई – दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजांनी केलेल्या सुमार कामगिरीवर लखनौ सुपर जायंट्सचा प्रशिक्षक गौतम गंभीर याने शिवीगाळ केली. या सामन्यात दिल्लीचा संघ विजयाच्या जवळ पोहोचला असतानाही लखनौच्या गोलंदाजांकडून त्यांना धावांची रसद पुरवली जात होती. त्यांच्या या सुमार कामगिरीमुळे गंभीर संतापला व त्याचा संयम सुटला.
Nothing better sight than watching Gautam Gambhir’s aggression 🔥🔥🔥
Missing his batting 🥺 pic.twitter.com/fRUkoQr1J2— Mahima (@im_mahima) May 1, 2022
त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला व गंभीरने स्पर्धेला गालबोट लावले अशा शब्दात चाहत्यांनी गंभीरवर टीका केली आहे. गंभीरच्या लखनौ संघाने दिल्लीचा पराभव केला मात्र, सामना हातातून जाण्याची स्थिती पाहुन गंभीरचा तोल ढळला होता.
दरम्यान, या सामन्यात नाणेफेक जिंकून लखनौच्या संघानं प्रथम फलंदाजी करत दिल्लीसमोर 196 धावांचं लक्ष्य ठेवलं. लखनौकडून कर्णधार केएल राहुलनं 51 चेंडूत 77 धावा केल्या. लखनौच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या संघाला 20 षटकात सात विकेट्स गामावून 189 धावापर्यंत मजल मारता आली आणि हा हा सामना लखनौच्या संघानं 6 धावांनी जिंकला.