अकलूज -येथील शिक्षण प्रसारक मंडळाचा निकाल 97.90 टक्के लागला आहे. मंडळाच्या 33 शाखांमधून 2859 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 2799 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
संस्थेच्या जिजामाता कन्या प्रशालेतील सहा मुलींनी संस्थेत प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. अनुक्रमे – प्रणिता मोहनराव मिटकल (99.20), किरण मगर, यांनी (99.20), प्रीती कागदे (98.80), शेजल शेटे, देविका मगर, आलिषा शेख या तिघींनी (98.40).
संस्थेच्या श्री गणेश विद्यालय पिंपळनेर, जिजामाता कन्या प्रशाला अकलूज, जयसिंह मोहिते पाटील विद्यालय संग्रामनगर, श्री विजयसिंह मोहिते विद्यालय वाघोली, श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील वि. कोथरुड, लक्ष्मीबाई कन्या प्रशाला यशवंतनगर, संत तुकाराम विद्यालय बोंडले, कृष्णानंद विद्यामंदिर पाटीलवस्ती, श्रीनाथ वि. लोंढे मोहितेवाडी, कर्मवीर बाबासाहेब पाटील वि. सदाशिवनगर, श्री सावतामाळी वि. माळेवाडी, श्री.विजयसिंह मोहिते पाटील वि.कोळेगाव, महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर अशा 13 शाखांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
शाळानिहाय निकाल पुढीलप्रमाणे – सदाशिवराव माने विद्यालय (98.79), मोरजाई वि. मोरोची (98.72), श्री हनुमान वि. लवंग (98.70), श्री पवसेश्वर वि. पळसमंडळ (97.73), श्रीमती र. मो. पा. प्र. व ज्यूनियर कॉलेज नातेपुते (97.62), श्री शंभू महादेव वि. उंबरे दहिगाव (97.56), श्री. बाणलिंग वि. फोंडशिरस (96.63), श्री संभाजीबाबा वि. इस्लामपूर (96.43), श्री. चक्रेश्वर वि. चाकोरे (95.83), प्रतापसिंह मोहिते पाटील वि. शिवपूरी (95.35), स. म. शंकरराव मोहिते पाटील वि. वेळापूर (95.08), अकलाई वि. अकलूज (95.00), सदाशिवराव माने वि. माणकी (93.59), श्री. विजयसिंह मोहिते पाटील वि. विझोरी (93.55), श्रीमती र. मो. पा. वि. मांडवे (92.98), श्री समर्थ रामदास विद्यामंदिर शिवथर (91.67), रामलिंग वि. कुरबावी (90.00), श्री काळभैरव वि. गुरसाळे (84.32), मोहनराव पाटील वि. बोरगाव (80.00), रात्र प्रशाला अकलूज (75.00) निकाल लागला. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, संचालक संग्रामसिंह मोहिते पाटील, संचालिका स्वरुपाराणी मोहिते पाटील, सचिव अभिजीत रणवरे-पाटील, सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील, सर्व प्रशाला समीतीचे पदाधिकारी, मुख्याध्यापक आदींनी अभिनंदन केले.
शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल
शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेजने यावर्षीही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. शाळेतून एकूण 86 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते, त्या पैकी 69 डिस्टिंगशन, 16 प्रथम श्रेणी आणि 1 विद्यार्थ्याने द्वितीय श्रेणी प्राप्त केली आहे. अनुक्रमे प्रथमेश पवार 96.20, अक्षता गज्जम 95.40, ईश्वरी पवार 94.80 टक्के गुण या मिळवली आहे. शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील व उपाध्यक्ष शितलदेवी मोहिते पाटील यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.