नगर – रुग्णसंख्या वाढीचे फाटले आभाळ..!

-आज 2 हजार 20 नवे रुग्ण; शहरात 622 करोनाबाधित -जिल्ह्यात आजही तब्बल 13 जणांचा मृत्यू -रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात चिंताजनक घट

नगर – नगर जिल्ह्यात आता रुग्णसंख्या वाढीचे जणू आभाळच फाटले आहे. रुग्णसंख्या वाढीचे रोजचे आकडे भीतादायक स्थिती दर्शवित आहेत. त्यातून आरोग्य यंत्रणेवर खूपच ताण आला आहे. आज एकाच दिवशी नगर जिल्ह्यात पुन्हा रेकॉर्डब्रेक रुग्णसंख्या वाढली.

एकाच दिवशी आज तब्बल 2 हजार 20 नवे रुग्ण सापडले असून, त्यात एकट्या नगर शहरातील 622 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आज 1 हजार 347 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 93 हजार 495 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 88.61 टक्के इतके झाले असून, ते दररोज घसरत आहे. आज तब्बल 13 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 2 हजार 20 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 10 हजार 766 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 763, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 860 आणि अँटीजेन चाचणीत 397 रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 294, अकोले 74, जामखेड 10, कर्जत 01, कोपरगाव 63, नगर ग्रामीण 48, नेवासा 08, पारनेर 22, पाथर्डी 37, राहता 19, राहुरी 26, संगमनेर 72, शेवगाव 37, श्रीरामपूर 19, कँटोन्मेंट बोर्ड 31, मिलिटरी हॉस्पिटल 01 आणि इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 268, अकोले 33, जामखेड 06, कर्जत 03, कोपरगाव 38, नगर ग्रामीण 56, नेवासा 12, पारनेर 09, पाथर्डी 12, राहाता 146, राहुरी 19, संगमनेर 124, शेवगाव 12, श्रीगोंदा 05, श्रीरामपूर 65, कँटोन्मेंट बोर्ड 12, इतर जिल्हा 38 आणि इतर राज्य 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 397 जण बाधित आढळुन आले. मनपा 60, अकोले 54, जामखेड 02, कर्जत 01, कोपरगाव 05, नगर ग्रामीण 12, नेवासा 32, पारनेर 16, पाथर्डी 68, राहाता 49, राहुरी 45, संगमनेर 09, शेवगाव 16, श्रीगोंदा 05, श्रीरामपूर 21 आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 453, अकोले 21, जामखेड 60, कर्जत 07, कोपरगाव 102, नगर ग्रामीण 68, नेवासा 18, पारनेर 26, पाथर्डी 92, राहाता 116, राहुरी 49, संगमनेर 90, शेवगाव 66, श्रीगोंदा 60, श्रीरामपूर 75, कॅन्टोन्मेंट 26, मिलिटरी हॉस्पिटल 03 आणि इतर जिल्हा 15 अशा रुग्णांचा समावेश आहे.

करोना अपडे्टस
बरे झालेली रुग्ण संख्या:93495
उपचार सुरू असलेले रूग्ण:10766
जिल्ह्यातील एकूण मृत्यू:1255
एकूण रूग्ण संख्या:1,05,516

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.