अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर कंगना राणावत म्हणते,‘येथे राहण्याचा काहीही अधिकार नाही  …’  

मुंबई  : राज्यात अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षाने सरकारवर सडकून टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच भाजपचे नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून,  गृहमंत्रिपदाचा राजीनामा ही तर फक्त सुरुवात आहे अशा शब्दात सरकारवर निशाणा साधला.

याच मुद्यावरून सोशलवर नेहमीच  वादग्रस्त विधानांवरून चर्चेत असणाऱ्या कंगना राणावतने  पुन्हा एकदा ट्विट केले आहे.  तिने ट्विट केले आहे की,’ पालघर येथे २०२० मध्ये साधू मॉब लिचींग आणि  स्त्रियांचा अपमान करणाऱ्यांचं येथे राहण्याचा काहीही अधिकार नाही.   #AnilDesmukh ही तर फक्त सुरुवात आहे  पुढे बघा होत काय  #UddhavThackeray असं ट्विट  ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.  

दरम्यान,मुंबई उच्च न्यायालयाने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का दिला असून माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत.  उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये हालचालींना वेग आला आहे. अखेर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाकडे अॅड. जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल याचिकेमध्ये आज पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सी.बी.आय. मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केलेले आहेत. त्यानुषंगाने मी मंत्री (गृह) या पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही, म्हणून मी स्वत:हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे. मला मंत्री (गृह) या पदावरुन कार्यमुक्त करावे, ही नम्र विनंती, असे राजीनामा पत्र अनिल देशमुख यांनी ट्विटरवर शेअर केले असून लवकरच मुख्यमंत्र्यांकडे सोपविण्यात असल्याचे सांगितले आहे.

 

 

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.