मुंबई : करोनाच्या नव्या विषाणूची अर्थात ओमायक्रॉनची आता नागपूरमध्ये एन्ट्री झाली आहे. बुर्किंना फासो या पश्चिम आफ्रिकेतील देशातून आलेल्या प्रवाशाला ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागपुरात पहिल्या ओमायक्रॉन रुग्णाची नोंद झाली आहे.
नागपूर विमानतळावर ४० वर्षीय प्रवासी ५ डिसेंबरला आला होता. यावेळी या प्रवाशाचे नमुने जमा करण्यात आले. या नमुन्यांची जिनोम सिक्वेंसिंग चाचणी करण्यात आली. त्यात त्याला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे. ओमायक्रॉन संसर्ग झालेल्या या रूग्णावर नागपूरमधील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहे.
Nagpur reports its first #Omicron case with 40-year-old man testing positive for the new coronavirus variant after returning from a West African country: Official
— Press Trust of India (@PTI_News) December 12, 2021
राज्यातील पहिला ओमायक्रॉन रूग्ण कल्याण डोंबिवलीत आढळला होता. यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये ६ आणि पुण्यात १ ओमायक्रॉन बाधित रूग्ण आढळले. यानंतर ६ डिसेंबरला मुंबईत २ जणांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.
पुन्हा १० डिसेंबरला मुंबईत ३ आणि पिंपरी चिंचवडमध्ये ४ रूग्ण आढळले. आता नागपूरमध्ये १ ओमायक्रॉन बाधित रूग्ण आढळला. यासह राज्यात एकूण १८ ओमायक्रॉन रूग्ण झाले आहेत.