नवी दिल्ली – देशभरातील ओमिक्रॉन रुग्णांची एकूण संख्या आता 422 पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे सर्वाधिक 108 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 42 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. शनिवारी, ओमिक्रॉनमध्ये देशभरात एकूण 415 रुग्ण होते. दिल्लीत ओमिक्रॉनचे 79 रुग्ण आहेत, त्यापैकी 23 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आतापर्यंत देशभरात एकूण 130 ओमिक्रॉन रुग्ण बरे झाले आहेत.
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशभरात 24 तासांत करोनाचे 6,987 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यासह, आतापर्यंत देशात कोविड बाधितांची एकूण संख्या 3 कोटी 47 लाख, 86 हजार 802 झाली आहे. गेल्या 24 तासात देशभरात कोविडमुळे एकूण 162 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात कोविडमुळे एकूण 4 लाख 79 हजार 682 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशभरात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 76,776 नोंदली गेली आहे. सक्रिय प्रकरणे एकूण संसर्गाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहेत. सध्या ते 0.22 टक्के आहे, जे मार्च 2020 नंतरचे सर्वात कमी आहे.
सध्या, देशातील कोविड रिकव्हरी दर 98.40 टक्के नोंदविला गेला आहे, जो मार्च 2020 नंतरचा उच्चांक आहे. गेल्या 24 तासांत देशभरात एकूण 7,091 रुग्ण कोविड महामारीतून बरे झाले आहेत. देशभरात आतापर्यंत एकूण 3 कोटी, 42 लाख, 30 हजार, 354 लोकांनी या साथीवर मात केली आहे.
देशातील साप्ताहिक पाजिटिव्हिटी दर 0.62 टक्के नोंदवला गेला आहे, जो गेल्या 42 दिवसांपासून एक टक्क्याच्या खाली राहिला आहे. दैनिक पाॅजिटिव्हिटी दर देखील 0.74 टक्के नोंदवला गेला आहे. गेल्या 83 दिवसांपासून तोही दोन टक्क्यांच्या खाली राहिला आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत, देशभरातील लोकांना आतापर्यंत एकूण 141.37 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.