न्यूयॉर्क – जगभर वाढत असलेल्या ओमायक्रॉनच्या प्रसारामुळे 24 डिसेंबरपासून आतापर्यंत तब्बल 24 हजार विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तर 2,982 विमानांची उड्डाणे उशीराने झाली आहेत. विमान प्रवासाशी संबंधित “फ्लाईट अवेअर’ या संकेतस्थळाने ही माहिती दिली आहे.
रद्द झालेल्या विमानांमध्ये स्कायवेस्ट कंपनीची 264, अलास्का एअरलाईन्सची 141, यनायटेडची 93 आणि अमेरिकेतील 84 विमानांचा समावेश आहे. नाताळच्याच संध्याकाळी 1,700 विमाने रद्द झाली होती. सोमवारी दिवसभरात 3 हजार विमानांची उड्डाणे रद्द केली गेली होती. तर मंगळवारी 1,100 विमाने रद्द केली गेली.
खराब हवामान आणि ओमायक्रॉनच्या प्रभावामुळे प्रवाशांकडून विमान प्रवासाकडे पाठ फिरवली जाऊ लागली आहे. विमानतलावर येण्यापूर्वी प्रवाशांनी आपल्या विमानाचे स्टेटस तपासून घ्यावे असे आवाहन प्रवाशांना करण्यात येत आहे.