मुंबई – करोना विषाणूंच्या जनुकीय संरचनेच्या तपासणीत मुंबईत गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये 88 टक्के नमुने हे ओमायक्रॉनने संसर्गित असल्याचे स्पष्ट झाले आहे. कस्तुरबा गांधी रुग्णालयात मुंबईतील नमुन्यांची जनुकीय तपासणी करण्यात येते. या तपासणीमुळे डेल्टापेक्षा संसर्गात ओमायक्रॉन प्रभावी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एकून 363 नमुन्यांची जनुकीय संरचना तपासण्यात आली. त्यातील 320 नमुन्यात (88 टक्के) ओमायक्रॉन, 30 नमुन्यात (8 टक्के) डेल्टाचे रुपांतरीत विषाणु तर तीन नमुन्यात (0.8 टक्के) डेल्टा आवृत्तीचे विषाणू आढळले आहेत. तर 10 नमुन्यात करोना विषाणूंच्या अन्य आवृत्ती आढळली. गेल्या महिन्यात तपासणी केलेल्याच्या विरूध्द परिस्थिती या महिन्यात आढळत आहे. गेल्या महिन्यात ओमायक्रॉनचे केवळ 55 टक्के संसर्गित नमूने असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ओमायक्रॉनच्या संसर्गालाही सहज घेऊ नये. करोनाविरोधातील लढ्याची शस्त्रे टाकून देऊ नयेत. नागोरिकांनी आरोग्याच्या मुद्द्यावर सजग असले पाहिजे
– शशांक जोशॅ, सदस्य राज्य टास्क फोर्स