नवी दिल्ली – पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांनी आज पंजाब प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष नवज्योत सिद्धु यांच्यावर येथील एका पत्रकार परिषदेत घणाघाती टीका केली. ते म्हणाले की सिद्धु हे पुन्हा पंजाबात कॅबिनेट मंत्री व्हावेत अशी पाकिस्तानची इच्छा आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांचे ते एक जवळचे मित्र आहेत. त्यामुळे सिद्धु पुन्हा मंत्री झाले तर इम्रानखान खुष होतील.
कॅ. अमरिंदरसिंग यांनी सांगितले की मी सिद्धु यांना आमच्या मंत्रिमंडळातून काढून टाकले त्यावेळी मला पाकिस्तानी पंतप्रधानांचा संदेश आला. तुम्ही सिद्धु यांना पुन्हा मंत्री केले तर मी तुमचा आभारी राहीन असे पाकिस्तानी पंतप्रधानांनी मला सुचवले होते असे त्यांनी नमूद केले.
सिद्धु हे पुर्ण अकार्यक्षम आणि बुद्धी नसलेले नेते आहेत, त्यांना मंत्री करू नका असे मी त्याचवेळी सोनिया गांधी यांना सुचवले होते असेही कॅ. अमरिंदरसिंग यांनी काल नमूद केले होते.