300 वर्षांचा इतिहास असणारा जुना बाजार

पुणे शहरात मागील अनेक वर्षांपासून मंगळवार पेठेत मुख्य रस्त्यावर दर बुधवार आणि रविवारी जुना बाजार भरतो. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते. हे टाळण्यासाठी पोलिसांनी बुधवारपासून हा बाजार प्रायोगिक तत्त्वावर बंद केला आहे. मात्र, यामुळे शेकडो विक्रेत्यांना फटका बसला आहे.

काय आहे जुना बाजाराचा इतिहास

या जुन्या बाजाराला 300 वर्षांचा इतिहास आहे. हा बाजार पूर्वी सध्याच्या महापालिका इमारतीच्या जागेत भरत होता. नंतर तो शनिवारवाड्यासमोर भरू लागला. 1961मध्ये पानशेत धरण फुटल्यावर हा बाजार गाडीतळ येथे विस्थापित करण्यात आला. यानंतर तो मंगळवार पेठेत आला. मंगळवार पेठेत आल्यावर त्याला “जुना बाजार’ असे संबोधले जाऊ लागले. गावाकडे भरणाऱ्या आठवडा बाजाराप्रमाणे हा बाजार भरत होता. ब्रिटिश काळापासून बुधवार आणि रविवारीदेखील बाजार भरू लागला. या बाजाराला सुरुवातीपासूनच मोठा प्रतिसाद मिळत असल्याने येथे दिवसेंदिवस व्यापाऱ्यांची संख्या वाढत आहे.

काय मिळते बाजारात?
या बाजारात लोखंड, सुटकेस, बॅग्ज, स्पेअर पार्टस, कापड, भांडी विक्रेते बसतात. अनेक विक्रेते जुन्या भंगार मालातून चांगला माल शोधून तो व्यवस्थित तयार करून त्याची विक्री करतात. येथे जुन्या नाण्यांसह तांबे-पितळीच्या दुर्मीळ मूर्तीही उपलब्ध असतात.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.