पिंपरी – येथे शिवसेनेच्या वतीने मावळ लोकसभा क्षेत्रातील पिंपरी-चिंचवड व मावळ विधानसभेतील पदाधिकारी यांचे प्रशिक्षण शिबिर रविवारी (दि. 28) सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन शिवसेना नेते संजय राऊत यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, संपर्क नेते बाळा कदम, खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबूकस्वार, शिवसेना महिला संपर्क नेत्या लतिका पास्ते, वैशाली सूर्यवंशी आदींसह व संयोजन समितीचे पदाधिकारी जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे, जिल्हा संघटिका शादन चौधरी आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिबिराचे संयोजन केले आहे.