महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी स्पर्धेत पूनम जाधव, पूजा ढेरंगे विजेत्या

“महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी’ स्पर्धा ः खान्देश अहिराणी मंचतर्फे आयोजन
पिंपरी – खान्देश अहिराणी कस्तुरी साहित्य, सांस्कृतिक, कला, क्रीडा मंचतर्फे आयोजित पुणे जिल्हास्तरीय “महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी’ स्पर्धेत नारायण गावची सौभाग्यवती गटात पूनम जाधव, पूजा तर कुमारी गटात पुजा ढेरंगे प्रथम क्रमांकांच्या मानकरी ठरल्या.

आचार्य अत्रे नाट्यगृहात ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेच्या उद्‌घाटनप्रसंगी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव, अभिनेत्री कल्याणी चौधरी, चित्रपट निर्माते कैलास वाणी, डॉ. जितेंद्र देसले, साहित्यिक राजन लाखे, संतोष साखरे, मृणाल गायकवाड, विजया मानमोडे आदी उपस्थित होते.

जिल्हास्तरीय निवड फेरीच्या 80 स्पर्धकांतून मुख्य स्पर्धेत 28 स्पर्धकांना सहभाग घेण्याची संधी मिळाली. सौभाग्यवती गटातून पूनम जाधव, अश्‍विनी जानराव, डॉ. प्रतिक्षा झगडे तर कुमारी गटातून पूजा ढेरंगे, पियुषा ढोले, रिध्दिषा निकम यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकाविले. जागृती जावळे, सारिका खाडे, प्रतिक्षा झगडे, जोगेश्‍वरी पाटील, प्रियंका अहिरे, कोमल नेटके, सोनाली पानसरे, राधिका श्रीखंडे, माधुरी सुर्वे, अनुजा पाटील, सायली कराडे, सेजल येवले यांनी विशेष शिर्षकांचा मुकुट पटकाविला. परिक्षक म्हणून मृणाल गायकवाड, कल्याणी चौधरी व उमेश कोटीकर यांनी काम पाहिले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)