नवी दिल्ली – ओएनजीसी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कार्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन इत्यादी तेल कंपन्या पुढील वर्षात 1.11 लाख कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करणार आहेत.
मागणी वाढविण्यासाठी नागरिकांच्या खात्यात थेट रक्कम देण्याऐवजी भांडवली गुंतवणूक करून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे धोरण अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आले आहे. या तेल कंपन्यांना सरकारकडून फारसे अनुदान मिळणार नाही. गेल्या वर्षी स्वयंपाकाच्या
गॅससाठी फक्त 4 हजार कोटींचे अनुदान देण्यात आले. यावर्षी ही रक्कम कमी करून 3 हजार 400 कोटी रुपये करण्यात आली आहे. मात्र या कंपन्या आगामी काळामध्ये तेलशुद्धीकरण, उत्खनन इत्यादी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक करून रोजगार निर्मिती वाढविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले.