पुणे – करोनाच्या तिसऱ्या लाटेत शहरातील करोनाबाधित दर तब्बल 45 टक्क्यांच्या पुढे गेला होता. मात्र, मागील आठ दिवसांपासून बाधित संख्या घटत असल्यामुळे गुरुवारी शहरातील बाधित दर निम्म्याने म्हणजे 20.38 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
दरम्यान, दिवसभरात 10 हजार 536 जणांच्या नमुने तपासणीत नव्याने 2 हजार 141 करोना बाधित सापडले. परंतु, आजही बाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या दुप्पट आहे.
दिवसभरात 4 हजार 136 बाधित करोनामुक्त झाले. तर आतापर्यंत 6 लाख 46 हजार 482 बाधितांपैकी 6 लाख 15 हजार 186 बाधित करोनामुक्त झाले. दरम्यान, करोनामुळे गुरुवारी 15 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामध्ये शहर हद्दीतील 9 जणांचा समावेश आहे. सध्या 22 हजार 26 बाधित सक्रिय असून, त्यातील 50 बाधितांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 288 बाधितांना ऑक्सीजन लावण्यात आला आहे.