नगर – स्वच्छ भारत अभियानांतर्गत महानगरपालिकेत अधिकारी-कर्मचारी यांनी आपल्या आजुबाजूचा परिसर, कार्यालय, घरदार व शहर परिसरात स्वच्छता राबवण्याबाबत कर्मचाऱ्यांनी सामूहिक शपथ घेतली.
आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपायुक्त प्रदीप पठारे, मुख्य लेखाधिकारी प्रवीण मानकर, शहर अभियंता व्ही.जी.सोनटक्के, अभियंता के. वाय.बल्लाळ, अतिक्रमण विभाग प्रमुख सुरेश इथापे, प्रकल्प अधिकारी आर.जी. मेहेत्रे पाणीपुरवठा विभाग प्रमुख एम.डी.काकडे, आस्थापना प्रमुख मेहेर लहारे, कामगार अधिकारी डी.एन.कोंडा, नगरसचिव एस.बी.तडवी, प्रभाग अधिकारी अंबादास सोनवणे, स्वच्छता निरीक्षक अन्वर शेख, स्वच्छता निरीक्षक राजकुमार सारसर, आर.सी.रामदिन, किशोर देशमुख तसेच आरोग्य विभागातील व इतर विभागातील अधिकारी अधिकाऱ्यांनी उपक्रमात सहभागी होऊन स्वच्छतेची शपथ घेतली.
कार्यालय, घरदार व शहराची स्वच्छता राखणेबाबत सर्वांनी मिळून शपथ घेतली. यावेळी आजूबाजूचा परिसर, कार्यालय, शहराच्या स्वच्छता राखणेबाबत सर्वांनी मिळून संकल्प केला. त्यानंतर सर्वांनी मिळून महानगरपालिकेतील संपूर्ण परिसराची स्वच्छता केली.