नवी दिल्ली – सत्य नाडेला यांची मायक्रोसॉफ्टचे चेअरमन म्हणून बढती झाली आणि भारतीय वंशाची व्यक्ती कंपनीची सीईओ आणि चेअरमन अशी दुहेरी जबाबदारी सांभाळत असणाऱ्या प्रतिष्ठितांच्या क्लबमध्ये त्यांचा समावेश झाला. अर्थात एकाच व्यक्तीने अशी दुहेरी जबाबदारी सांभाळण्याबाबत मतमतांतरे आहेत.
आज परदेशात मुख्यालय असणाऱ्या अशा साठ कंपन्या आहेत ज्यांचा वार्षिक महसूल एक अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे आणि त्यांचे नेतृत्व भारतीय वंशाच्या एक्झिक्युटिव्हजकडे आहे. त्यापैकी काहीजण कंपनीचे चेअरमन आणि सीईओ अशी दुहेरी जबाबदारी सांभाळत आहेत. आता या निवडक दिग्गजांमध्ये सत्य नाडेला यांचा समावेश झालेला आहे.
आयबीएममधील अनुभवी अधिकारी अरविंद कृष्णा यांची गेल्यावर्षी कंपनीच्या सीईओपदी नियुक्ती झाली आणि डिसेंबरमध्ये त्यांच्याकडे चेअरमनपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली. फेअऱफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्जचे प्रेम वत्स 1985 पासून चेअरमन आणि सीईओ म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
आर्सेलर मित्तल कंपनीचे लक्ष्मी मित्तल, फेडएक्सचे राज सुब्रमणियम, अल्बर्टसन्सचे विवेक शंकरन्, बेस्ट बायचे माईक मोहन, नोकीयाचे राजीव सुरी, ओलम इंटरनॅशनलचे सनी वर्गीस, अडोबचे शंतनु नारायण, वेफेअरचे सुरज शाह अशी मोठी यादी आहे. त्याखेरीज बड्या परदेशी कंपन्यांची धुरा भारतीय वंशाचे साठजण सांभाळत आहेत.
परदेशातील एक अब्जापेक्षा जास्त महसूल असणाऱ्या कंपन्यांची जबाबदारी सांभाळणारे मूळ भारतीय वंशाच्या व्यक्ती
मानांकन नाव – कंपनीचे नाव – पद
1 सुंदर पिचाई – गुगल अँड अल्फाबेट – सीईओ
2 सत्य नाडेला – मायक्रोसॉफ्ट – चेअरमन अँड सीईओ
3 अरविंद कृष्णा – आयबीएम – चेअरमन अँड सीईओ
4 लक्ष्मी मित्तल – आर्सेलरमित्तल – चेअरमन अँड सीईओ
5 राज सुब्रमणियम – फेडएक्स – प्रेसिडेंट, सीओओ
6 विवेक शंकरन् – अल्बर्टसन्स – प्रेसिडेंट, सीईओ
7 वसंत नरसिम्हन – नोव्हार्टिस – सीईओ
8 पुनित रंजन – डेलॉईट ग्लोबल – सीईओ
9 भारत मसरानी – टीडी बँक – सीईओ, ग्रुप प्रेसिडेंट
10 माईक मोहन – बेस्ट बाय – प्रेसिडेंट सीओओ
11 बॉब पटेल – लॉईंडेलबसेल इंडस्ट्रीज – सीईओ
12 राजीव सुरी – नोकिया – सीईओ, प्रेसिडेंट
13 रेवती अद्वैती – फ्लेक्स – सीईओ
14 सनी वर्गीस – ओलम इंटरनॅशनल – सहसंस्थापक, ग्रुप सीईओ
15 प्रेम वत्स – फेअरफॅक्स फायनान्शियल – चेअरमन अँड सीईओ
16 संजय मेहरोत्रा – मायक्रॉन टेक्नॉलॉजी – सीईओ, प्रेसिडेंट
17 सौम सुतारिया – टेनेट हेल्थकेअर – प्रेसिडेंट, सीओओ
18 अजय बंगा – मास्टरकार्ड – चेअरमन
19 इव्हान मेन्झेस – डियाजिओ – सीईओ
20 लक्ष्मण नरसिम्हन – रेकिट बेन्कायझर – ग्रुप सीईओ