बलिया – आम आदमी पक्षाच्या उत्तरप्रदेशातील सहा नेत्यांच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गद्वार पोलिस ठाण्यात स्थानक प्रमुखांच्या तक्रारीवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या नेत्यांनी मोदी, ईडी अणि सीबीआय या संबंधात आक्षेपार्ह भाषा केली आणि मोदींची प्रतिमा जाळली असे तक्रारीत म्हटले आहे.
आम आदमी पक्षाचे हे नेते मनिष सिसोदिया यांच्या वर करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईवरून निदर्शने करीत होते. या नेत्यांना अटक करण्याचा प्रयत्न सुरू आहे असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. निदर्शनांच्या ठिकाणीच त्यांना अटक करण्यात येणार होती परंतु ते तेथून पळून गेले असे पोलिसांचे म्हणणे आहे.