ओडिशा विधानसभा निवडणुक 2019 : नवीन पटनाईक सलग पाचव्यांदा मुख्यमंत्री

ओडिशा – देशातील तगड्या प्रादेशिक पक्षांमध्ये बिजू जनता दलाचा (बीजेडी) समावेश होत असून नवीन पटनाईक सातत्याने निवडून येत आहेत. गेली 19 वर्षे नवीनबाबू ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत. यावेळी ओडिशात लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. देशात सर्वत्र मोदी नावाची चर्चा असताना ओडिशात नवीन पटनाईक यांनी पुन्हा एकदा बाजी मारली असून सलग पाचव्यांदा ते मुख्यमंत्री होणार आहेत.

मोदींच्या लाटेतही ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी राज्यातील आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळविले आहे. ओडिशा विधानसभा निवडणुकीचा अधिकृत निवडणुक निकाल लागला असून बीजेडीने 111 जागेवर विजय मिळवत पुन्हा एकदा वर्चस्व गाजविले आहे. याठिकाणी भारतीय जनता पक्षाला 23 तर काँग्रेसला अवघ्या 9 जागावर विजय प्राप्त झाला आहे. तर अपक्ष केवळ एका ठिकाणी विजयी झाले आहे.

 

दरम्यान, मागच्या वेळी राज्यातील विधानसभा निवडणुकीत 147 पैकी 117 जागा बीजेडीने जिंकल्या होत्या, तर कॉंग्रेसने 16 आणि भाजपने 10 जागा प्राप्त केल्या होत्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.