नवी दिल्ली ( obc caste census ) – ओबीसी जातनिहाय जनगणनेच्या मागणीसह बिहार येथील १० पक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी सर्व सदस्यांचे जातीनिहाय जनगणनेबाबतचे म्हणणे ऐकून घेतले. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना, याबाबत योग्य निर्णय घ्या अशी विनंती पंतप्रधान मोदी यांच्याकडे केल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले.
यंदाच्या जनगणनेमध्ये ओबीसी जातींची जातीनिहाय जनगणना व्हावी ही मागणी जोर धरत आहे. बिहारमधील प्रमुख पक्षांच्या एका शिष्टमंडळाने याप्रश्नी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विशेष म्हणजे ओबीसी जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व विरोधीपक्ष नेते तेजस्वी यादव एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.
तत्पूर्वी, राजनाथसिंह गृहमंत्री असताना त्यांनी, केंद्र सरकार ओबीसी जातीनिहाय जनगणना करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र यावरून मोदी सरकारने यु-टर्न घेतल्याचे पाहायला मिळाले. विरोधामध्ये असताना ओबीसी जातनिहाय जनगणनेची मागणी करणारे पक्ष सत्तेत आल्यानंतर मात्र भूमिका बदलतात असंच चित्र आजपर्यंत पाहायला मिळाले आहे.
भारतात ब्रिटिश काळापासून जनगणना झालेली नाही. स्वातंत्र्यानंतर जातींमध्ये वाद होऊ नये म्हणून ही जनगणना बंद करण्यात आली असा दावा करण्यात येतो. मात्र जातीच्या आधारावर जनगणना प्रत्येकाच्या हिताची आहे. अशी जनगणना कोणत्याही जातीच्या समुहाला अस्वस्थ करेल अशी चिंता करणं निराधार आहे, असं मत नितीश कुमार यांच्यासह अनेक नेत्यांनी मांडलं आहे. ( obc caste census )
Delhi | Bihar CM Nitish Kumar arrives at South Block to meet PM Narendra Modi over caste census pic.twitter.com/sebuvuXKqW
— ANI (@ANI) August 23, 2021