मराठी पाऊल पडते पुढे…! दीक्षा शिंदेची नासाच्या फेलोशिपसाठी निवड

औरंगाबाद – महाराष्ट्रातील औरंगाबादच्या दीक्षा शिंदेने उंच भरारी घेतली आहे. तिची नासा (NASA ) या जगप्रसिद्ध या अमेरिकन संस्थेत एमएसआय या फेलोशिप व्हर्च्युअल पॅनलवर पॅनलिस्ट म्हणून निवड झाली आहे.
Maharashtra | Diksha Shinde, a 14-yr-old girl in Aurangabad, was selected as a panellist on NASA’s MSI Fellowships Virtual Panel.
“I wrote a theory on black holes & God. It was accepted by NASA after 3 attempts. They asked me to write articles for their website,”she said (18.08) pic.twitter.com/yxDqApWKWm
— ANI (@ANI) August 19, 2021
दीक्षा शिंदेचे वडील कृष्णा शिंदे हे विनाअनुदानित खासगी शाळेचे मुख्याध्यापक असून तिची आई रंजना शिकवणी घेते. दीक्षा शिंदे मुळ औरंगाबादची असून तिच्या अथक मेहनतीने तिला हे यश प्राप्त झाले आहे. तिने गेल्या तीन ते चार वर्षा पासून या साठी प्रयत्न करणे सुरु केले होते . तिने या संपूर्ण प्रवासाबाबत माध्यमांना माहिती दिली आहे.
तिने सांगितले की, ‘मी ब्लॅक होल्स आणि गॉडवर एक सिद्धांत लिहिला. ३ प्रयत्नानंतर नासाने ते स्वीकारले. त्यांच्या वेबसाइटसाठी त्यांनी मला लेख लिहायला सांगितले आहे. मी माझे काम सकाळी १ ते ४ च्या दरम्यान करेन आणि मला त्यासाठी मासिक मानधनही मिळणार आहे.”
या साठी मी फार सुरुवातीपासूनच स्टीफन हॉकिंगची पुस्तके वाचली होती आणि नंतर सप्टेंबर २०२० मध्ये ‘क्विस्शनिंग द एक्सिस्टन्स ऑफ गॉड’ नावाचा एक लेख नासाला सादर केला. मात्र माझा हा लेख पहिल्या प्रयत्नात नाकारण्यात आला.
मात्र मी या साठी गेल्या तीन ते चार वर्षांपासून पर्यंत केले आणि मला यात यश आले. तिच्या या यशाबाबत तिचे वडील कृष्णा शिंदे म्हणाले की, ‘नासाच्या आर्टिकलसाठी तिने खूप मेहनत घेतली. दोनदा अपयश आल्यावरही हार मानली नाही, तिची मेहनत आणि स्वप्नांना आमचा कायम पाठिंबा आहे





