Trending News – शेतकऱ्याचे नाव घेताच आपल्या डोळ्या समोर फक्त नांगर चालवणाऱ्या व्यक्तीचा फोटो येतो, मात्र आता ऑडीमध्ये बसून भाजी विकायला गेलेल्या शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हिडिओ पाहिल्यानंतर देशातील प्रत्येक शेतकरी असा यशस्वी व्हावा. अशीच इच्छा सर्वांची असेल.
View this post on Instagram
केरळमधील तरुण शेतकरी सुजित याने ‘व्हेरायटी फार्मर’ नावाच्या त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो शेतात पालक कापताना दिसत आहे. शेतातून काढलेला भाजीपाला बाजारात विकण्यासाठी तो ऑडी कारमधून जाताना दिसतो. सुजीत बाजारात पोहोचताच, तो त्याचे बूट काढतो, त्यानंतर रस्त्याच्या कडेला दुकान लावतो.
व्हिडिओ शेअर करताना सुजीतने कॅप्शनमध्ये लिहिले की, “ऑडी कारमध्ये गेलो आणि पालक विकले.” व्हिडिओ पोस्ट होताच, सोशलवर हा व्हिडिओ तीन दिवसांत 6 हून अधिक मिनियन्सनी पाहिला गेला. अनेक नेटिझन्स या व्हिडिओला लाइक करत आहेत आणि त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
एकाने लिहिले, ‘ते कसे शेती करतात, कापणी करतात, पैसे कमवतात आणि एक समृद्ध जीवन जगतात हे पाहून मला आनंद वाटतो.’ दुसऱ्याने लिहिले, ‘तुम्ही कष्ट केलेत तर तुम्हाला नक्कीच यश मिळते.’ एकाने लिहिले, ‘आमच्या सर्व शेतकऱ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. देश सुखी आणि समृद्ध होवो. शेतकऱ्यांची प्रतिमा बदलली पाहिजे.’ असं म्हणत या तरुण शेतकऱ्याचे कौतुक केले जात आहे. ( Farmer )