मुंबई – ओरहान अवतरमानी हे बॉलिवूडमधील एक चर्चित नाव आहे.त्याला कोणतेही फिल्मी बॅग्राऊंड नसले तरी इंडस्ट्रीमध्ये तो एक फेमस चेहरा आहे. अनेकदा त्याचे नाव अभिनेत्री जान्हवी कपूरसोबत जोडले गेले. त्यासोबतच तो अजय देवगण आणि त्याची मुलगी न्यासा देवगणसह अनेकदा दिसून येतो. नुकतंच त्याने आपल्या इन्स्टा अकाउंटवरून एका पार्टीचे फोटो आणि व्हिडीओज पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये न्यासा देवगण देखील आहे.
ओरीने शेअर केलेल्या या फोटो आणि व्हिडिओमध्ये सर्वजण पार्टीच्या मूडमध्ये दिसत आहेत. न्यासा व्यतिरिक्त ओरीचे इतर अनेक मित्र या पार्टीत एन्जॉय करताना दिसत आहेत. ओरीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये न्यासा मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर ओरीच्या या फोटोंवर अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छाही दिल्या आहेत.
View this post on Instagram
जान्हवी कपूरने यावर कमेंट करत मिस यु असं लिहिलं आहे. तर अनेकांनी हे फोटो शेअर देखील केले आहेत. इतर चाहत्यांनी या स्टार किड्सच्या पार्टीला पैकी गुण देखील दिल्याचे कमेंटमध्ये दिसून येते. तसेच अनेक युजरने तर त्यांच्या टेबलवरील पदार्थ पाहून पार्टीच बजेट देखील काढायला सुरुवात केली आहे.