नवी दिल्ली : काँग्रेसच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ‘भारत जोडो’देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, या यात्रेला मध्य प्रदेशात सुरुवात झाली. या यात्रेदरम्यान इंदूरमध्ये खासदार राहुल गांधींनी बाईक चालवण्याचा आनंद लुटला. त्याचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे.
या व्हिडीओत राहुल गांधी कार्यकर्त्यांच्या घोळक्यात ब्लू कार्पेटवर बाईक चालवताना दिसत आहेत. यावेळी रस्ता मोकळा करण्यासाठी सुरक्षा अधिकाऱ्यांची बरीच दमछाक झालेली पाहायला मिळाली. पदयात्रेदरम्यान निवांत क्षणी फुटबॉल खेळतानाचा राहुल गांधींचा व्हिडीओ नुकताच समोर आला होता. आदिवासींसोबत नृत्याचा आनंदही लुटताना ते दिसले होते.
आज इंदौर के रास्ते में #BharatJodoYatra🇮🇳 के दौरान श्री @RahulGandhi जी ने मोटरबाइक बुलेट की सवारी की pic.twitter.com/KYmLLEGWpD
— Haryana Pradesh Congress Sevadal (@SevadalHRY) November 27, 2022
मध्य प्रदेशातील या पदयात्रेत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधीदेखील सहभागी झाल्या आहेत. आगामी २०२४ मधील निवडणुकीसाठी काँग्रेसकडून या पदयात्रेद्वारे मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. पदयात्रेदरम्यान काहींनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुजरात निवडणूक प्रचारात सक्रीय नसल्याची टीका होत असतानाच पदयात्रा सुरू ठेवण्यावर राहुल गांधी भर देताना दिसत आहेत. गुजरातमध्ये गेल्याच आठवड्याच त्यांनी एका सभेला संबोधित केले होते.