पुणे :- ‘आम्ही नूमवीय’ तर्फे प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही दीपोत्सव- 2021 चे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या दीपोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे 1971 च्या ‘नूमवीय’च्या बॅचला यंदा शाळा सोडून 50 वर्षे होत आहे. त्यामुळे ह्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या बॅचने पुढाकार घेऊन दीपोत्सव-2021 चे आयोजन केले होते. सोमवार दिनांक 1 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी बाजीराव रोड वरील नूमवी (नूतन मराठी विद्यालय) शाळेच्या प्रांगणात हा दीपोत्सव पार पडला.
यावेळी आकर्षक रांगोळी सह लाखो दिवे आणि पणत्यांनी नूमवीचा परिसर झळाळून सोडण्यात आला. ह्या नयनरम्य क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आणि शाळेच्या जुन्या आठवणी जागविण्यासाठी आम्ही नूमवीय 1971 च्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या बॅचच्या विद्यार्थ्यांसह माजी नूमवीय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.
‘नूमवीय’ 1971 सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम समितीच्या वतीने अभय दांडेकर, प्रभाकर वैद्य, संजय गायकवाड, प्रमोद लाळे, सुरेंद्र सोमण, शिरीष रिस्वडकर, अजित घैसास, सुमंत रानडे, शेखर गुळवणी, प्रकाश खिंवसरा, प्रदीप गवंडे आदींनी केले आहे.
हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी आम्ही ‘नूमवीय’ संघटनेचे कार्याध्यक्ष किशोर लोहोकरे, अध्यक्ष अजीत रावेतकर, सचिव मिलिंद शालगर आदींनी सिंहांचा वाटा उचलला होता.