नवी दिल्ली – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या 9 महिन्यांच्या मुलीवर बलात्काराची धमकी ट्विटरवरून देण्यात आली आहे. @Criccrazyygirl या अकाउंटवरून देण्यात आलेली धमकी वाचणं देखील संताप आणणारं होतं.
ट्विटवरून बलात्काराची धमकी देणार्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. धमकीचं ट्विट डिलीट करण्यात आलं आहे. मात्र या हँडल्सद्वारे केलेल्या ट्विटचे स्क्रीनशॉट उपलब्ध आहेत.
पाकिस्तानविरुद्ध झालेल्या मानहानिकारक पराभवानंतर सोशल मीडियावर मुस्लीम असल्याने मोहम्मद शमीवर टीकेची झोड उठली होती. त्यामुळे व्यथीत झालेल्या कोहलीने शमीच्या समर्थनार्थ ट्विट करून ट्रोलर्सला फटकारलं होतं. त्यानंतर लगेच कोहलीला अशा प्रकारे धमकी देण्यात आली आहे.