अभिनेत्री आणि तृणमूल कॉंग्रेसची खासदार नुसरत जहॉं आणि तिचा नवरा निखील जैन विभक्त झाले आहेत. त्यांनी आता सोशल मीडियावरून आपल्या लग्नाचे फोटोदेखील डिलीट करून टाकले आहेत.
नुसरत जहॉं आणि निखील जैनचे लग्न 2019 मध्ये तुर्कीमध्ये झाले होते. मात्र, हे लग्न आपल्याला मान्य नसल्याचे नुसरत म्हणाली होती. तिने निखीलवर काही गंभीर आरोपही लावले होते. लग्नाचे फोटो डिलीट केल्यानंतर तिने एक पोस्ट केली आहे.
“गप्प बसणारी महिला म्हणून मला लक्षात ठेवले जावे असे वाटत नाही.’ असे तिने म्हटले आहे. नुसरत आणि निखील गेल्या 6 महिन्यांपासून वेगळे राहात आहेत. त्यांच्या लग्नाची खूप जास्त चर्चा झाली होती.
अलीकडेच नुसरतच्या प्रेग्नन्सीचीही बातमी आली होती. मात्र हे मूल आपले नाही असे निखील म्हणाला होता. तर दुसरीकडे विदेशात झालेले लग्न भारतात मान्य होणार नाही. आपल्यालाही हे लग्न मान्य नाही. त्यामुळे घटस्फोटाच्या औपचारिकतेची काहीही गरज नाही, असे नुसरत म्हणाली होती.