Nushrratt Bharuccha । काहींना कपड्यांचे, तर काहींना दागिन्यांचे, मेकअपचे किंवा घड्याळांचे कलेक्शन असते. अशात अभिनेत्री नुसरत भरुचाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. यात तिचे शू कलेक्शन दिसत आहे. तिच्याकडे खरोखरच अप्रतिम फुटवेअर कलेक्शन असल्याचे दिसून येते. नुसरतचा व्हिडिओ सोशल मीडियावर होत आहे.
नुसरत भरुचाचे शू कलेक्शन पाहून यूजर्स वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. एकाने लिहिले, ‘आणि माझी आई म्हणते की माझ्याकडे चपलांच्या खूप जोड्या आहे.’ दुसऱ्याने कमेंट केली, ‘आतापासून मी सुद्धा असाच संग्रह ठेवायला सुरुवात करेन.’ मात्र, काही युजर्सने म्हटले की, नुसरत भरुचा शो ऑफ करत आहे. अशा संमिश्र प्रतिक्रिया येत आहे.
तिने व्हिडिओत तिच्या घर टीममधील काही लोकांना देखील सामील केले होते, जे तिच्या कपाटाची व्यवस्था करण्यात मदत करत होते. एका चित्रात नुसरत भरुचा तिच्या शूजसोबत पोज देताना दिसत आहे आणि तिने असेही लिहिले आहे की, ‘नुश आणि तिचा बूट कारखाना.’
प्रोफेशनल फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नुसरत भरुचा 2023 साली चार चित्रपटांमध्ये दिसली, ज्यात ‘अकेली’, ‘छत्रपती’, ‘तू झुठी में मक्कर’ आणि ‘सेल्फी’ यांचा समावेश आहे. ती आता ‘छोरी 2’ या चित्रपटात दिसणार आहे.