मुंबई – प्रसिद्ध हिप हॉप रॅपर यो यो हनी सिंगवर एक डॉक्युमेंट्री फिल्म बनवणार जाणार आहे. हनी सिंगच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी समोर आली आहे. याहूनही विशेष म्हणजे ऑस्कर विजेती निर्माती गुनीत मोंगा यांनी ही डॉक्युमेंट्री बनवण्याचे काम हाती घेतले आहे. गुनीत मोंगाच्या सिख्या एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली हनी सिंगवर आधारित माहितीपटाची निर्मिती केली जाणार आहे.
हनी सिंगचा ही डॉक्युमेंट्री फिल्म नेटफ्लिक्सवर येणार आहे. चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांना रॅपरच्या आयुष्याची ओळख करून घेता येणार आहे. विशेष म्हणजे हनी सिंगची क्रेझ जगभरात आहे. त्याची गाणी तरुणाईला विशेष आवडतात. मात्र, हनी सिंगलाही अनेक वादांना सामोरे जावे लागले आहे. करिअरच्या शिखरावर असताना हनी सिंग अचानक गायब झाला आणि त्यानंतर अचानक त्याने आपल्या आजाराची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याने नैराश्याचा सामना केला आहे. एकंदरीतच, हनी सिंगचे आयुष्य चढ-उतारांनी भरलेले आहे, जे आता डॉक्युमेंट्रीद्वारे सर्वांसमोर येणार आहे.
या डॉक्युमेंट्री फिल्मबद्दल हनी सिंग म्हणतो, ‘मी मीडियासमोर नेहमीच माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल खुलेपणाने बोललो आहे. पण मला ते सर्वांसमोर मांडता आले नाही. मला माझ्या चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले आहे, ते माझी संपूर्ण कथा जाणून घेण्याचे हकदार आहेत. या नेटफ्लिक्स डॉक्यु-फिल्मद्वारे ते मला ओळखतील. माझे जीवन, मी कोठून आहे, बॉलीवूडमधून ब्रेक आणि कमबॅक या सर्व बाबी अत्यंत प्रामाणिकपणे समोर आणल्या जातील.
दुसरीकडे, गुनीत मोंगा म्हणतात, ‘हनी सिंग भारतीय संगीत उद्योगातील एका नव्या बदलाचा साक्षीदार बनला आहे. तरुणांमध्ये त्याची जबरदस्त क्रेझ आहे. मला त्याची जीवनकथा एक्सप्लोर करायची होती. यासाठी मी नेटफ्लिक्सची आभारी आहे.गुनीत मोंगा यांच्या ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ या माहितीपटाला नुकताच ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.