नवी दिल्ली – पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या कथित वक्तव्यामुळे वादात सापडलेल्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना भाजपने रविवारी (5 जून) निलंबित केले. यानंतर नुपूरने माफीही मागितली आणि तिच्या कुटुंबाला असलेल्या धोक्याबद्दलही सांगितले. या सगळ्यात आणखी एक चर्चा सुरू झाली आहे. नवीन जिंदाल आणि नुपूर शर्मा यांच्या निलंबनाचा निर्णय भाजपने अरब देशांच्या नाराजीनंतर घेतल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. कतार MoFA ने देखील कतारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने भारतीय राजदूत डॉ. दीपक मित्तल यांना बोलावले आणि त्यांना अधिकृत निवदेन सुपूर्द केले, ज्यामध्ये भारतातील सत्ताधारी पक्षाच्या एका अधिकाऱ्याने पैगंबर मुहम्मद यांच्या विरोधात व्यक्त केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल नाराजी आणि निषेध व्यक्त केला.
सोशल मीडियावर चर्चा –
मिळालेल्या माहितीनुसार, अरब देशांशी संबंधित काही सोशल मीडिया अकाऊंट सतत दावा करत आहेत की अरब देशांतील लोक नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या वक्तव्यावर प्रचंड संतापले होते. त्यामुळे सौदी अरेबिया, कुवेत, बहरीन आदी देशांतील लोक भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घालत होते, कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका सहाय्यकाने पैगंबर मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे अरब देशांनी भारतातील हिंदूवादी राष्ट्रीय पक्ष भाजपच्या विरोधात बहिष्कार मोहीम सुरू केली. या बहिष्कारामुळे भाजपने घाबरून नूपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना निलंबित केल्याचा दावा सोशल मीडिया पोस्टमध्ये केला जात आहे. त्याचबरोबर पक्षाची धर्मनिरपेक्ष असल्याची प्रतिमाही त्यांनी बोलून दाखवली.
إن الاجتراء الوقح البذيء من الناطق الرسمي باسم الحزب المتطرف الحاكم في الهند على رسول الإسلام ﷺ وعلى زوجه الطاهرة أم المؤمنين عائشة رضي الله عنها هو حرب على كل مسلم في مشارق الأرض ومغاربها، وهو أمر يستدعي أن يقوم المسلمون كلهم قومة واحدة pic.twitter.com/T58Ya1dGox
— أحمد بن حمد الخليلي (@AhmedHAlKhalili) June 4, 2022
वस्तुस्थिती काय आहे?
नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या निलंबनामागे अरब देशांचा दबाव असल्याबाबत अरब देशांच्या अनेक न्यूज वेबसाइट्स पाहणयात आल्या पण या संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. तथापि, अरब देशांमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बायकाॅट इंडिया ट्रेंड निश्चितपणे आढळून आला. त्याचवेळी ओमानचे ग्रँड मुफ्ती अहमद अल-खलिली यांनीही यासंदर्भात ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले की, ‘भारतातील सत्ताधारी पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्याने इस्लामच्या दूताविषयी अपमानजनक टिप्पणी केली. ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो अशी आम्ही प्रार्थना करतो. आता पृथ्वीवरील प्रत्येक मुस्लीम, मग तो पूर्वेचा असो किंवा पश्चिमेचा, या प्रश्नाकडे लक्ष देऊन एक राष्ट्र म्हणून उठले पाहिजे’. याशिवाय सौदी अरेबिया, पॅलेस्टाईनसह सर्व अरब देशांतील विचारवंतांनीही या प्रकरणाला विरोध दर्शवला.
नवीन जिंदाल आणि नुपूर शर्मा का होते वादात?
वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्यानंतर भारतात दोन समुदायांमध्ये तणावाचे वातावरण आहे. टीव्ही चॅनेल्सवर या मुद्द्यावर सतत चर्चा होत असते. अशाच एका चर्चेदरम्यान नुपूर शर्माने पैगंबर मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, त्यानंतर विरोध सुरू झाला. त्याचवेळी कानपूरमध्येही हिंसाचार उसळला होता. दुसरीकडे, नवीन जिंदाल यांनी 1 जून रोजी ट्विट केले होते, ज्यामध्ये त्यांनी पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात वक्तव्य केले होते.