मॉस्को – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांदरम्यानच्या संरक्षण सहकार्य भागीदारीला यापुढच्या काळातही कायम सुरू ठेवण्याबाबतची कटिबद्धता व्यक्त केली. यावेळी द्विपक्षीय आणि प्रादेशिक पातळीवरच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली, असे रशियातील भारतीय दूतावासाच्या ट्विटर हॅन्डलवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादासाठी कोणत्याही देशाला करू दिला जाऊ नये आणि अफगाणिस्तानमधील नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर पहिल्यांदा अफगाणिस्तानच्या लोकांसाठी करण्यात यावा, अशी अपेक्षाही डोवाल यांनी पुतीन यांच्याशी बोलताना व्यक्त केली.
#RussiaUkraineWar : झेलेन्सकींची युरोपिय संघाकडे अधिक शस्त्रांची मागणी
यावेळी झालेल्या बैठकीला रशियाव्यतिरिक्त भारत, इराण, कझाकस्तान, किरगीझस्तान, चीन, ताजिकीस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान आदी देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी अफगाणिस्तानमधील सुरक्षितता आणि मानवतावादी आव्हाने आदी अन्य विषयांवरदेखील चर्चा करण्यात आली.