नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत सांगितले कि, एनपीआर संदर्भात कोणतेही कागदपत्रे मागितले जाणार नाही. जी माहिती तुमच्याकडे नाही ती माहिती देण्याची गरज नाही. देशातील कोणत्याही नागरिकाला घाबऱ्याण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले.
गृह मंत्री अमित शाह: मैं स्पष्टता के साथ कहता हूं कि NPR में कोई डॉक्यूमेंट नहीं मांगा जाएगा।जो जानकारी आपके पास नहीं हैं, वो देने की जरुरत नहीं है। इस देश में किसी को भी NPR की प्रक्रिया से डरने की जरूरत नहीं है। https://t.co/gFYUm1WtMf
— ANI_HindiNews (@AHindinews) March 12, 2020
पुढे बोलताना गृहमंत्री म्हणाले की, मला हे सांगताना दुःख होत आहे कि, संपूर्ण देशभरात सीएएबद्दल मुस्लिम बांधवांच्या आणि भगिनींच्या मनात ‘का’ कायद्याबाबत भीती निर्माण झाली आहे.
सीएएमधून तुमचं नागरिकत्व काढून घेण्यात येईल अशा खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत. सीएए हा नागरिकत्व घेणारा कायदा नाही तर, नागरिकत्व देणारा कायदा आहे.देशात एनपीआर कायद्याची भीती बाळगू नये, असे देखील गृहमंत्री म्हणाले.