भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त श्रीमानयोगी प्रतिष्ठानच्या वतीने कोथरुड येथील महाराजांच्या स्मारकाभोवती १०० फूट लांब आणि ३० फूट उंचीचे आरमारातील जहाज साकारण्यात आले आहे. हुबेहूब असणारे हे जहाज पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. आठवडाभर हे जहाज पाहण्याची संधी नागरिकांना असल्याचे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांनी सांगितले.