नवी दिल्ली – भारतीय जनता पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “हिंदुहृदयसम्राट” म्हणून प्रोजेक्ट करून २०२४ ची लोकसभा निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवण्याच्या तयारीत आहे, असे काँग्रेस नेते शशी थरूर यांनी म्हटले आहे. एका सोशल मिडीया पोस्टमध्ये, थरूर यांनी नमूद केले की मोदी २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन करणार आहेत आणि १४ फेब्रुवारीला ते अबुधाबीमध्ये एका हिंदू मंदिराचे उद्घाटन करणार आहेत, त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्या जातील.
थरूर म्हणाले की, लोकसभा निवडणूक ही हिंदुत्व विरुद्ध लोककल्याणकारी धोरणे यांच्यातील लढाई म्हणून आकार घेत आहे. या सगळ्या पाश्र्वभूमीवर आर्थिक आव्हाने, वर्षाला दोन कोटी नोकऱ्या निर्माण करणे आणि प्रत्येक भारतीयाच्या खिशात खर्च करण्यायोग्य उत्पन्न टाकणे या प्रश्नांवर चर्चा होणे आवश्यक आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. या आधीच्या लोकसभा निवडणुकीत मोदींना आर्थिक विकासाचा अवतार म्हणून भारतीय मतदारांपुढे प्रोजेक्ट गेले होते, पण त्या कामात मोदी अपयशी ठरले.
२०१९ च्या निवडणुकीत विनाशकारी नोटबंदी, पुलवामा दहशतवादी हल्ल्याने मोदींना सार्वत्रिक निवडणुकीचे राष्ट्रीय सुरक्षा निवडणुकीत रूपांतर करण्याची संधी दिली, असे ते म्हणाले. त्यामुळेच आता २०२४ मध्ये हे स्पष्ट आहे की भाजप आता आपल्या मूळ संदेशाकडे परत येईल आणि नरेंद्र मोदींना हिंदुहृदयसम्राट म्हणून देशापुढे प्रोजेक्ट करतील असे भाकित त्यांनी केले.
मोदींना कोणत्याच धोरणात यश आले नाही असे नमूद करून ते म्हणाले की, अच्छे दिनाचे काय झाले्य, वर्षाला दोन कोटी नोकऱ्यांचे काय झाले्?, आर्थिक विकासाचे काय झाले? आदि प्रश्नही त्यांनी मोदींना उद्देशून विचारले. या सर्व प्रश्नांवर हिंदुत्व विरुद्ध लोककल्याण अशा स्वरूपाच्या निवडणुक लढाईची चर्चा करावी लागेल,असे थरूर म्हणाले.