…आता लसीकरण वाढवण्यासाठी प्रयत्न : राव

पुणे – गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली लसीकरण मोहीम संथ गतीने सुरू आहे. मात्र, ती गती आणि लसीकरणाची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत दिल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

लसीकरण व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे आणि फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरणाचे प्रमाण वाढवणे आवश्‍यक आहे. त्यावरही विस्तृत चर्चा झाली. खासगी वैद्यकीय प्रॅक्‍टीशनर्सनाही अद्याप लस मिळाली नाही. त्यांच्या नोंदणीमध्ये समस्या येत आहेत, त्या दूर करणे, लसीकरण व्यवस्थापनावर भर देणे आणि त्यातील त्रुटी दूर करणे याबद्दल पालकमंत्र्यांनी सूचना केल्याचे राव म्हणाले.

लसीकरणात सुरूवातीला ऍपसंदर्भात तांत्रिक प्रश्‍न यामध्ये निर्माण झाला होता, तो सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. 73 टक्के हेल्थ वर्कर्सचे लसीकरण झाले आहे. फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण कमी झाले आहे. ते वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. लस घेण्यासाठी लाभार्थींना प्रोत्साहन देण्याचा विषय आहे.

ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद आहे, परंतु त्या उलट महापालिका हद्दीत कमी आहे; तो वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे आश्‍वासन दोन्ही महापालिका आयुक्तांनी पालकमंत्र्यांना दिल्याचे राव यांनी नमूद केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.