Corona Vaccine : इंजेक्‍शननंतर करोनावर आता टॅब्लेट आणि स्प्रे ?

लंडन – करोनाची लस घेण्यासाठी आता लवकरच इंजेक्‍शनसह टॅब्लेटही दिली जाऊ शकते. ऑक्‍सफर्ड विद्यापीठाचे शास्त्रज्ज्ञ यावर संशोधन करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. ऑक्‍सफर्ड-ऍस्ट्राझेनेका व्हॅक्‍सीनच्या प्रमुख संशोधक असलेल्या सारा गिल्बर्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या टीमने इंजेक्‍शन फ्री लसीवर काम सुरु केले आहे. डेली मेल या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.

हाऊस ऑफ कॉमन्स सायन्स ऍन्ड टेक्‍नॉलॉजी कमिटीला या संशोधनाबद्दल माहिती देताना सारा गिल्बर्ट यांनी सांगितलं की, नेजल स्प्रेद्वारे अनेक फ्लू व्हॅक्‍सीन दिले जातात आणि आम्ही त्याच प्रकारे काम करणारे एखादे व्हॅक्‍सीन शोधत आहोत. तोंडावाटे केल्या जाणाऱ्या लसीकरणाबाबतही विचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे ज्यांना इंजेक्‍शनची भीती वाटते अशांना टॅब्लेटद्वारे लसीकरण केले जाऊ शकते.

दरम्यान, अशा प्रकारची टॅब्लेट बनायला उशीर लागू शकतो. कारण, त्याची सुरक्षा आणि होणाऱ्या परिणामांचे परीक्षण करण्यासाठी काही कालावधी लागतो, असेही गिल्बर्ट यांनी स्पष्ट केले. मिळालेल्या माहितीनुसार टॅब्लेटची क्‍लिनिकल ट्रायल अमेरिकेत सुरु करण्यात आली आहे. तर ब्रिटनमध्ये नेजल स्प्रेची ट्रायल सुरु आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.