अहमदाबाद – फिरकीपटू अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने तिसऱ्या कसोटीत इंग्लंडवर दहा विकेट्सनी दणदणीत विजय मिळविला. या विजयासह चार सामन्याच्या मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. अक्षर पटेल सामन्याचा मानकरी ठरला.
इंग्लंडने भारताला विजयासाठी अवघ्या 49 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान भारतीय संघाच्या सलामी जोडीनेच पूर्ण केलं. रोहित शर्माने नाबाद 25 तर शुबमन गिलने नाबाद 15 धावा केल्या.
अक्षर पटेल आणि आर. अश्विन विजयाचे शिल्पकार ठरले. अक्षरने तिसऱ्या कसोटीत पहिल्या डावात 6 आणि दुसऱ्या डावात 5 अशा एकूण 11 तर अश्विनने पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 4 अशा एकूण 7 विकेट्स घेतल्या. तसेच अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये 400 विकेट्स घेण्याचा टप्पा देखील पार केला.
भारताच्या फिरकी गोलंदाजांनी दोन्ही डावात मिळून 20 पैकी 19 विकेट्स घेतल्या. तर एकमेव विकेट ही वेगवान गोलंदाजाच्या खात्यात गेली. फिरकी गोलंदाजांनी केलेल्या कमालीमुळे तिसऱ्या कसोटी सामन्याचा निकाल अवघ्या दुसऱ्या दिवशीच लागला.
धावफलक –
#INDvENG 3rd Test : भारताचा दमदार विजय, अक्षर -अश्विन ठरले विजयाचे शिल्पकार
#IND (Sec ing ) 49/0(7.04)
भारत फलंदाजी(दुसरा डाव) :- रोहित शर्मा 25*(25), शुभमन गिल 15*(21)
इंग्लंड गोलंदाजी (दुसरा डाव) :- जॅक लिच 15/0(4.0), जो रूट 25/0(3.4)
-भारताचा 10 विकेट्सने दणदणीत विजय
-चार सामन्याच्या मालिकेत भारताची 2-1 ने आघाडी
-तिसऱ्या कसोटीत अक्षरच्या एकूण 11 विकेट्स तर अश्विनच्या 7 विकेट्स
—————————————————————————————-
दुसऱ्या डावातही फिरकीसमोर इंग्लंडचे लोटांगण
#ENGLAND Second Innings :
#ENG 81/10(30.4)
इंग्लंडचा दुसरा डाव 81 धावांवर आटोपला
– भारतासमोर विजयासाठी 49 धावांचे आव्हान
– अक्षर पटेलचे 5 तर अश्विनचे 4 बळी
– इंग्लंडचे जॅक क्राऊली,जाॅनी बेयरस्टो, जोफ्रा आर्चर,जेम्स अॅडरसन शून्यावर बाद
– अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 400 विकेट्सचा टप्पा ओलांडला
इंग्लंड फलंदाजी (दुसरा डाव) : जॅक क्राउली 0(1), डाॅम सिबली 7(25), जाॅनी बेयरस्टो 0(2), जो रूट 19(45), बेन स्टोक्स 25(34), आॅली पोप 12(15), बेन फोक्स 8(28), जोफ्रा आर्चर 0(2), जॅक लीच 9(22), स्टुअर्ट ब्राॅड 1*(7), जेम्स अॅडरसन 0(3)
भारतीय गोलंदाजी ( दुसरा डाव) – अक्षर पटेल 32/5(15.0), रविचंद्रन अश्विन 48/4(15.0), वाॅश्गिंटन सुंदर 1/1(0.4)
——————————————————————————————–
#INDIA First innings : जो रूटचा बळींचा ‘पंच’, भारताचाही पहिला डाव गडगडला
– भारताचा पहिला डाव 145 वर आटोपला
– पहिल्या डावानंतर भारताकडे फक्त 33 धावांची आघाडी
– जो रूटचा बळींचा पंच
– रोहित शर्मांची अर्शतकी खेळी, इतर फलंदाज अपयशी
-पूजारासह अक्षर पटेल, वाॅश्गिंटन सुंदर शून्यावर बाद