कार्यकर्त्यांना पाठबळ देणार : प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी
पुणे – पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्यांना पाठबळ देऊन, कॉंग्रेस पक्षाला नंबर एकचा पक्ष बनवेन, अशी ग्वाही महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी दिली.
प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष आणि पार्लमेंटरी बोर्डाच्या निमंत्रकपदी मोहन जोशी यांची निवड झाल्यानंतर जोशी यांचे पुण्यात प्रथमच आगमन झाले. त्यावेळी ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव प्रसाद आबनावे यांच्या हस्ते पुष्पहार घालून सर्वांच्या वतीने जोशी यांचा सत्कार करण्यात आला.
“पक्षश्रेष्ठींनी संघटनेतील मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. हा विश्वास सार्थ ठरवणार. कॉंग्रेसचे कार्यकर्ते हीच माझी ताकद आहे,’ असे जोशी म्हणाले.
मोहन जोशी यांना मोठी जबाबदारी मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांना एक हक्काचा माणूस मिळाला आहे, अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाबीर शेख, चेतन अग्रवाल यांनी सूत्रसंचालन तर प्रकाश आरणे यांनी आभार मानले.
यावेळी कैलास गायकवाड, अरुण वाघमारे, चंद्रशेखर कपोते, संगीता तिवारी, शिवाजी बांगर, राजेंद्र भुतडा, प्रविण करपे, डी.एन.पोळेकर, एडविन रॉबर्ट आदी उपस्थित होते.