RBI in Action Mod | Paytm ची मूळ कंपनी One97 Communications चे शेअर्स गेल्या एक महिन्यापासून सतत चढ-उतार होत आहेत. Fit Paytm चे शेअर्स आज बाजार उघडल्यानंतर घसरले. पेटीएम पेमेंट्स बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) रद्द करण्याची बातमी समोर आल्यानंतर शेअर्समध्ये घट आली. आरबीआय पेटीएमची बँकिंग शाखा पीपीबीएलचा परवाना रद्द करू शकते,असे वृत्त सध्या समोर येतंय.
प्राप्त माहितीनुसार, एक अहवाल समोर आला असून त्यानुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (PPBL) चा बँकिंग परवाना रद्द करण्यासारखे अनपेक्षित पाऊल उचलू शकते. अहवालात पुढे म्हटले आहे की, मध्यवर्ती बँक PPBL च्या महत्त्वाच्या कार्यांवर देखरेख ठेवण्यासाठी प्रशासक देखील नियुक्त करू शकते.
पेटीएमचे शेअर घसरले RBI in Action Mod |
One97 कम्युनिकेशन्सचे शेअर्स 0.89 टक्क्यांनी घसरून 409.68 रुपयांवर व्यवहार करत होते. शेअर्सचे लोअर सर्किट 393.70 आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रात पेटीएमचे शेअर्स 424.05 रुपयांवर उघडले होते आणि 425.45 रुपयांवर बंद झाले होते.
हेही वाचा
पेटीएम पेमेंट्स बँकेचे सहसंस्थापक विजय शेखर शर्मा यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा
तसेच पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा, ज्यांना सतत अडचणींचा सामना करावा लागत होता, त्यांनी पेमेंट्स बँकेच्या अर्धवेळ नॉन-कार्यकारी अध्यक्ष आणि बोर्ड सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. पेमेंट्स बँकेत विजय शेखर शर्मा यांची ५१ टक्के हिस्सेदारी आहे तर वन९७ कम्युनिकेशन्सची ४९ टक्के हिस्सेदारी आहे. आरबीआयने पीपीबीएलला त्यांचे कामकाज बंद करण्यासाठी १५ मार्चची मुदत दिली आहे.दरम्यान, नियमांचे पालन न केल्यामुळे, पेटीएम पेमेंट्स बँक 2018 पासून आरबीआयच्या रडारवर आहे.