पॅरिस – सर्बियाच्या नोवाक जोकोव्हिचने जागतिक टेनिस क्रमवारीत अग्रस्थान कायम राखले आहे. मॉंट्रियल स्पर्धा जिंकणारा राफेल नदालने द्वितीय स्थान मिळविले आहे.
रॉजर फेडररने तिसरा क्रमांक घेतला असून डॉमिनिक थिएमला चौथा क्रमांक मिळाला आहे. मागील आठवड्यात पहिल्या पाच क्रमांकामध्ये असलेल्या स्टेफानोस त्सित्सिपासची घसरण झाली आहे. तो आता सातव्या स्थानावर आहे. जपानच्या केई निशिकोरीने पाचव्या क्रमांकावर झेप घेतली असून ऍलेक्झांडर जेवेरेव्ह याला पाचवा क्रमांक देण्यात आला आहे.
मॉंट्रियल स्पर्धेत उपविजेतेपद मिळविणारा डॅनिली मेदवेदेव याने आठवे स्थान मिळविले असून कॅरेन खाचानोव्ह व फॅबिओ फोगनिनी हे अनुक्रमे नवव्या व दहाव्या क्रमांकावर आहेत.