वादाला मिळाले राजकीय स्वरूप
कोलकाता – पश्चिम बंगाल मधीला दुर्गा पुजा मंडळांना आयकर नोटीसा बजावण्यात आल्या असून त्यांच्यावरही केंद्र सरकारने आयकर लागू केला आहे. तो विषय तृणमुल कॉंग्रेसने लाऊन धरीत या निर्णयाच्या विरोधात मोठे आंदोलन छेडले आहे. त्यावरून भाजपने तृणमुल कॉंग्रेस वर पलटवार करताना म्हटले आहे.
की दुर्गा पुजा मंडळांच्या हिशोबातून तृणमुल कॉंग्रेसचे नेते मनिलॉड्रिंग करीत असल्याने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यातून तृणमुल कॉंग्रेसचा डाव उघड पडल्याने हा पक्ष आगपाखड करीत आहेत असे भाजपने म्हटले आहे. त्यामुळे हा वाद आता चांगलाच पेटला आहे.
दुर्गा पुजा उत्सवाला पश्चिम बंगाल मध्ये मोठे महत्व आहे. या मंडळांना सरकारने करातून वगळावे अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली. दुर्गापुजा उत्त्सवावर कर लागू करून आणि त्यांना आयकराच्या नोटीसा जारी करून भाजप सरकारने हिंदु विरोधी भूमिका घेतल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी कालच केला होता. त्यांची ही भूमिका भाजपला चांगलीच झोंबली असून त्यांनी आता तृणमुलवर पलटवार करून हा विषय त्यांच्यावरच उलटवण्याचा प्रयत्न केला आहे.
ममतांनी येत्या 13 तारखेपासून केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावर भाजपचे राष्ट्रीय चिटणीस राहुल सिन्हा यांनी म्हटले आहे की दुर्गा पुजा समितीच्या खर्चाचा हिशोब आयकर विभागाने मागवला त्यात बिघडले कुठे? अनेक दुर्गा पुजा मंडळावर तृणमुलचे नेते व मंत्री पदाधिकारी आहेत.
त्यांचा काळापैसा पांढरा करून घेण्यासाठी दुर्गा पुजा मंडळांचा उपयोग केला जातो असा आरोप त्यांनी केला. आपली ही लिंक उघड होऊ नये म्हणून तृणमुलवाल्यांनी हा कांगावा चालवला आहे असे त्यांनी म्हटले आहे. मोहरम सारख्या सणासाठी दुर्गा पुजा थांबवणाऱ्या ममता बॅनर्जींना या विषयावरून बोलण्याचा अधिकार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.