नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या सुष्मिता देव यांनी केला आहे. यापूर्वी खासदार सुष्मिता देव यांनी अनेक वेळा केंद्रीय निवडणूक आयोगाला यासंदर्भात तक्रार केली आहे. मात्र आपल्या तक्रारीवर निवडणूक आयोग कोणतीच कारवाई करत नसल्याचे सांगून काँग्रेसच्या खासदार सुष्मिता देव यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणी घेत केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे.
Supreme Court issues notice to Election Commission of India after hearing Congress MP Sushmita Dev's petition against PM Narendra Modi and BJP President Amit Shah for allegedly violating Model Code of Conduct. Next hearing on May 2. pic.twitter.com/iMwMOwlx2E
— ANI (@ANI) April 30, 2019
नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे आचारसंहितेचा भंग करीत असून, निवडणूक आयोग काँग्रेसच्या नेत्या सुश्मिता देव यांच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई करीत नसल्याचे देव यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २ मे रोजी होणार आहे. दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयाने याबद्दल निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे.