मुंबई – आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीत स्वतःच एक वेगळं निर्माण करणाऱ्या अभिनेता सुशांत सिंह रजपूत याने आज आपला जीवनप्रवास थांबवला. आज दुपारी मुंबईतील बांद्रा परिसरामध्ये असलेल्या निवासस्थानी सुशांतने गळफास घेत आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आणि अवघा देश शोक सागरात बुडाला.
आपल्या अभिनय कारकिर्दीला छोट्या पडद्यावरून सुरुवात करणाऱ्या सुशांतने बड्या पडद्यावरूनही सिनेरसिकांना मोहिनी घातली. स्वतः एक दर्जेदार अभिनेता असलेला सुशांत अभिनेता शाह रुख खान याचा मोठा फॅन होता. शाहरुख खानच्या अदाकारीचे सुशांतने अनेकदा सार्वजनिकरित्या कौतुकही केले होते. मात्र आता सुशांतने आपल्या सर्वांचा निरोप घेतला असून आपल्याकडे केवळ त्याच्या आठवणीच शिल्लक राहिल्या आहेत.
सुशांतच्या जाण्याबाबत शाहरुख खानने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून शोक व्यक्त केला आहे. शाह रुख लिहितो, “त्याचं माझ्यावर खूप प्रेम होतं. सुशांतच्या आठवणी कायम राहतील. त्याची काम करण्याची ऊर्जा, उत्साह आणि त्याची स्माईल! अल्ला त्याच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो! अत्यंत दुःखद आणि धक्कादायक!”
The corona crisis will not last long. Our scientists & scientists in other countries are working day and night to develop the vaccine. I am confident that we will get the vaccine very soon: Union Minister Nitin Gadkari at ‘Gujarat Jan Samvad’ rally via video conference pic.twitter.com/NwGbSRLACB
— ANI (@ANI) June 14, 2020