महंमद शमी कांगारूंना लोळविण्यासाठी सज्ज

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी आयपीएलचा लाभ

कोलकाता – अमिरातीत होत असलेल्या आयपीएल स्पर्धेतील सरावाचा तसेच खेळाचा आगामी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी मोठा लाभ होईल, असा विश्‍वास भारताचा वेगवान गोलंदाज महंमद शमी याने व्यक्‍त केला आहे. केवळ आयपीएलच नाही तर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठीही सज्ज असल्याचे त्याने सांगितले.

मार्च महिन्यापासून जगभरात करोनाचा धोका वाढल्याने क्रिकेट ठप्प झाले होते. त्यामुळे गेल्या जवळपास सहा महिन्यांच्या कालावधीत खेळाडूंना सराव करणे तर दूरच. घरातूनही बाहेर पडता आले नव्हते. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या महत्त्वाच्या मालिकेपूर्वी एखाद्या स्पर्धेची नितांत गरज होती. हीच गरज आयपीएल स्पर्धेत भरून निघेल. 

ही स्पर्धा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी किती लाभदायक ठरेल, असे वाटेल, पण जिथे क्रिकेटच थांबले होते तिथे आता खेळाडूंना टी-20 का होईना पण क्रिकेट खेळायला मिळणार आहे हे महत्त्वाचे आहे. त्याबरोबर खेळाडूंना मैदानात उतरून खेळ करता येणार आहे. त्यामुळे पुढील मालिकेसाठी खेळाडू सज्ज होतील, असेही मत त्याने व्यक्‍त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.