बारामतीतून दिलासादायक बातमी

32 हजार 840 जणांच्या तपासणीत आढळले केवळ 18 करोना संक्रमित : 'जनता कर्फ्यू'मुळे बाधितांमध्ये घट

बारामती (पुणे) – शहरात राबविण्यात आलेल्या “माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत झालेल्या आरोग्य तपासणीत बारामतीकरांना ‘जनता कर्फ्यू’चा फायदा होत असल्याचे आले आहे. 32 हजार 840 नागरिकांची तपासणी केल्यानंतर 18 करोना संक्रमित रुग्ण आढळून आले. ही बाब बारामतीकरांसाठी दिलासादायक ठरली आहे.

 

 

 

बारामती नगर परिषद हद्दीमध्ये मोहिमेच्या अंतर्गत आत्तापर्यंत 8233 कुटुंबातील 32 हजार 840 लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 97 संशयित व्यक्ती आढळून आले. त्यापैकी 55 जणांची करोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 18 पॉझिटिव्ह तर 37 जण निगेटिव्ह आढळले आहेत. शुक्रवारी देखील ही मोहीम राबविण्यात येणार असून उर्वरित बारामतीकरांची तपासणी त्यामध्ये होणार आहे.

 

बारामतीकरांनी ‘जनता कर्फ्यू’च्या दरम्यात दाखवलेला संयम महत्त्वाचा ठरला आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या आरोग्य तपासणीत हे वास्तव समोर आले आहे.
– सचिन सातव, गटनेते बारामती नगरपरिषद

 

 

 

मोहिमे अंतर्ग सुरू असलेल्या मोहितील 18 पॉझिटिव्ह व्यक्‍तींवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. वेळेत रुग्ण निदर्शनात आल्याने त्यांच्यापासून इतरांना होणारा संसर्गाचा धोका कमी झाला आहे.
– डॉ.मनोज खोमणे, वैद्यकीय अधिकारी, बारामती तालुका

Leave A Reply

Your email address will not be published.